मुलगी वडिलांना : बाबा एक मुलगा माझ्या मागे लागला आहे , सारखा मला "आय लव्ह यु " म्हणत असतो .
काय करू ?...
वडील : एक काम कर त्याच्याशी लग्न करून टाक, पुन्हा कधी तो तसे म्हणेल तर मी माझे नाव बदलून टाकेल ...
पती आपल्या बायकोला
पती: अग , कमालच झाली, रोजतर तासंतास फोनवर बोलत असतेस , आज अर्ध्या तासातच फोन आटोपला .
बायको : रॉंग नंबर होता, कुणीतरी सरला बोलत होती, आता तिच्याशी किती वेळ बोलणार .
मालकीण : सकू, मला सारखं वाटत, कि आमचे हे आफिसमधल्या दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडले आहेत
सकू (मोलकरीण ): असं नका बोलू बाईसाहेब , ते मला धोका नाही देऊ शकत !
एका रिक्षावाल्याला पोलिस अडवतो.
पोलिस: रिक्षा गॅसवर आहे?
रिक्षावाला: नाही.
पोलिस: मग डिझेलवर?
रिक्षावाला: नाही.
पोलिस: बरं पेट्रोलवर आहे म्हणजे?
रिक्षावाला: नाही
पोलिस: अरे मग कशावर आहे?
रिक्षावाला: हफ्त्यावर.