Friday, December 30, 2016

स्वेटर

दोन मैत्रिणी बोलताना

एक मैत्रीण : आठ दिवसात तू माझा स्वेटर विणून देणार होतीस . पण अजून स्वेटर तयार नाही
दुसरी मैत्रीण : अग , मी गेले आठ दिवस रजेवर आहे , मी ऑफिस मध्ये गेलीच नाही 

Thursday, December 29, 2016

समंजस कुत्रा

घरी आलेला पाहुणा नास्ता करीत असताना

पाहुणा : तुमचा कुत्रा फारच समंजस दिसतोय , तो सारखा माझ्याकडे बघतो आणि शेपटी हलवितो
गृहिणी : अरे रे चुकून मी त्याचीच प्लेट तुम्हाला दिलीय 

Wednesday, December 28, 2016

तरुण

तरुण तरुणी वेटरशी बोलतांना

वेटर : बोला ! काय हवंय तुम्हाला ? साधा डोसा , मसाला डोसा , पेपर डोसा
तरुण : आडोसा 

Tuesday, December 27, 2016

ग्रीटिंग कार्ड

ग्रीटिंग कार्ड दुकानदार एक तरुणीशी बोलतांना

दुकानदार : तुम्ही म्हणताय तस "मी तुझी आणि फक्त तुझीच आहे !" असं लिहिलेलं कार्ड आहे आमच्याकडे
तरुणी : छान मग मला अशी दहा कार्ड द्या . 

Monday, December 26, 2016

घटस्फोट

वकील एका महिलेला

वकील : मी तुम्हाला घटस्फोट मिळून देईल पण तुमचा नवरा तुमच्याशी प्रामाणिक नाही हे तुम्ही क्षवरून म्हणता?
महिला : कारण माझ्या एकही मुलात आणि नवर्याच्या साम्य नाही

Sunday, December 25, 2016

भांडण

पती पत्नीचे भांडण चालू असतांना

पती : तुझ्या डोक्यात ना नुसतं शेण भरलंय शेण
पत्नी : तरीच, आता मला कळले तुम्ही इतक्या वेळ माझं डोकं का खात होता 

Saturday, December 24, 2016

मातृभाषा

मुलगा आपल्या वडीलांना

मुलगा : बाबा ! आपण जे बोलतो त्या भाषेला मातृभाषा का म्हणतात ?
वडील : कारण बेटा वडिलांना ती भाषा बोलायची संधी कवचितच मिळते 

Friday, December 23, 2016

क्रेडिट कार्ड

बँकेचा सेल्समन एक तरुणीला

सेल्समन : मॅडम आमची बँक तुम्हाला शॉपिंग साठी फ्री क्रेडिट कार्ड देऊ इच्चीते
मॅडम : नो थँक्स माझ्याकडे बॉयफ्रेंड आहेना , सो मला गरज नाही 

Thursday, December 22, 2016

रोमिओ

रस्त्यावरील रोमिओ मुलगी जवळून जात असताना

रोमिओ : तू धरतीपे चाहे जहाँ रहे तुझे 'तेरी खुशबूसे पहचान लुंगा
मुलगी : आई शपत ! मला अगोदर पासून शंकाच होती , कि तू मेल्या कुत्राच आहे 

Wednesday, December 21, 2016

साडी

कामवाली मालकीनिशी बोलतांना

कामवाली : बाईसाहेब हि घ्या तुमची साडी
मालकीण : का ग ?
कामवाली : मग काय , हि साडी नेसली कि साहेबाना वाटत कि तुम्हीच आहात , ते लक्ष पण देत नाही आणि शेजार्याला पण वाटत तुम्हीच आहेत , तर तो येता जाता चावट पणा करतो 

सोन्या

सोन्या आपल्या प्रियसीला

सोन्या : प्रिये मला एका प्रश्नाचे उत्तर दे
प्रियसी : विचारणा
सोन्या : तुझ्या आयुष्यातला मी पहिलाच ना ज्याने तुझे चुंबन घेतले ?
प्रियसी : अर्थातच , पण मला हे कळत नाही सगळे हाच प्रश्न का विचारतात ?

Wednesday, December 14, 2016

लग्न

एक तरुणी एक साधू बाबा समोर

तरुणी : बाबा ! मला दोन प्रियकर आहेत , मला सांगा माझं लग्न कुणाशी होईल , कोण असेल तो भाग्यवान ?
बाबा : (हसून) पाहिल्याशी होईल आणि दुसरा भाग्यवान ठरेल 

Tuesday, December 13, 2016

स्वर्ग

नवरा बायको आपसात चर्चा करीत असताना

बायको - "अहो ऐकलंत का मी ऐकलंय नवराबायको मरून स्वर्गात गेले कि तिथे त्यांना एकमेकाजवळ फिरकू देत नाही म्हणे
नवरा - ह ... म्हणूनच त्याला स्वर्ग म्हणतात कि काय ?