Sunday, February 12, 2017

चंद्र

एक कैदी दुसऱ्या कैद्याशी माणूस चंद्रावर गेला याची बातमी ऐकून

एक कैदी : बघ माणसाने प्रयत्न केला कि एक ना एक दिवस त्याला यश नक्कीच मिळते
दुसरा कैदी : होणं , माझी सुद्धा अशी इच्छा आहे कि ऐकणं एक दिवशी मी चंद्रावरच्या तुरुंगात जाईल 

Tuesday, February 7, 2017

जेम्स व्हॅट

वडील मुलाला 

वडील : बाळा तू मला कुठलाही प्रश्न विचारू शकतो कारण बाप हा मुलापेक्षा जास्ती हुशार असतो 
मुलगा : बाबा . आगगाडीच्या इंजिने चा शोध कुणी लावला ? 
वडील : जेम्स व्हॅट 
मुलगा : त्याचा बाप त्याच्यापेक्षा हुशार होता ना ? मग त्यांनी तो शोध का नाही लावला ?

Friday, February 3, 2017

चोर

पोलीस चोरासी बोलतांना

पोलीस : चोरी करतांना तुला तुझ्या बायको , पोरांचा विचार आला नाही का ?
चोर: विचार आला होता साहेब पण काय करणार त्या दुकानात फक्त पुरुषांचंच सामान होत 

Thursday, February 2, 2017

प्रेम

प्रियसी : तुझे माझ्यावर प्रेम आहे ना ?
प्रियकर : होग , पण तू असे का विचारतेस एकदम
प्रियसी : मला नाही वाटत असं
प्रियकर : पण तू असे बोलतेस
प्रियसी : तुझे नक्कीच माझ्यावर प्रेम आहेना ?
प्रियकर :अर्थातच
प्रियसी : नक्की ?
प्रियकर :हो ग !
प्रियसी : मग काल रात्री मी फेसबुक वर जे स्टेट टाकले त्याला लाइक का नाही केलेस ?