Friday, December 30, 2016

स्वेटर

दोन मैत्रिणी बोलताना

एक मैत्रीण : आठ दिवसात तू माझा स्वेटर विणून देणार होतीस . पण अजून स्वेटर तयार नाही
दुसरी मैत्रीण : अग , मी गेले आठ दिवस रजेवर आहे , मी ऑफिस मध्ये गेलीच नाही 

Thursday, December 29, 2016

समंजस कुत्रा

घरी आलेला पाहुणा नास्ता करीत असताना

पाहुणा : तुमचा कुत्रा फारच समंजस दिसतोय , तो सारखा माझ्याकडे बघतो आणि शेपटी हलवितो
गृहिणी : अरे रे चुकून मी त्याचीच प्लेट तुम्हाला दिलीय 

Wednesday, December 28, 2016

तरुण

तरुण तरुणी वेटरशी बोलतांना

वेटर : बोला ! काय हवंय तुम्हाला ? साधा डोसा , मसाला डोसा , पेपर डोसा
तरुण : आडोसा 

Tuesday, December 27, 2016

ग्रीटिंग कार्ड

ग्रीटिंग कार्ड दुकानदार एक तरुणीशी बोलतांना

दुकानदार : तुम्ही म्हणताय तस "मी तुझी आणि फक्त तुझीच आहे !" असं लिहिलेलं कार्ड आहे आमच्याकडे
तरुणी : छान मग मला अशी दहा कार्ड द्या . 

Monday, December 26, 2016

घटस्फोट

वकील एका महिलेला

वकील : मी तुम्हाला घटस्फोट मिळून देईल पण तुमचा नवरा तुमच्याशी प्रामाणिक नाही हे तुम्ही क्षवरून म्हणता?
महिला : कारण माझ्या एकही मुलात आणि नवर्याच्या साम्य नाही

Sunday, December 25, 2016

भांडण

पती पत्नीचे भांडण चालू असतांना

पती : तुझ्या डोक्यात ना नुसतं शेण भरलंय शेण
पत्नी : तरीच, आता मला कळले तुम्ही इतक्या वेळ माझं डोकं का खात होता 

Saturday, December 24, 2016

मातृभाषा

मुलगा आपल्या वडीलांना

मुलगा : बाबा ! आपण जे बोलतो त्या भाषेला मातृभाषा का म्हणतात ?
वडील : कारण बेटा वडिलांना ती भाषा बोलायची संधी कवचितच मिळते 

Friday, December 23, 2016

क्रेडिट कार्ड

बँकेचा सेल्समन एक तरुणीला

सेल्समन : मॅडम आमची बँक तुम्हाला शॉपिंग साठी फ्री क्रेडिट कार्ड देऊ इच्चीते
मॅडम : नो थँक्स माझ्याकडे बॉयफ्रेंड आहेना , सो मला गरज नाही 

Thursday, December 22, 2016

रोमिओ

रस्त्यावरील रोमिओ मुलगी जवळून जात असताना

रोमिओ : तू धरतीपे चाहे जहाँ रहे तुझे 'तेरी खुशबूसे पहचान लुंगा
मुलगी : आई शपत ! मला अगोदर पासून शंकाच होती , कि तू मेल्या कुत्राच आहे 

Wednesday, December 21, 2016

साडी

कामवाली मालकीनिशी बोलतांना

कामवाली : बाईसाहेब हि घ्या तुमची साडी
मालकीण : का ग ?
कामवाली : मग काय , हि साडी नेसली कि साहेबाना वाटत कि तुम्हीच आहात , ते लक्ष पण देत नाही आणि शेजार्याला पण वाटत तुम्हीच आहेत , तर तो येता जाता चावट पणा करतो 

सोन्या

सोन्या आपल्या प्रियसीला

सोन्या : प्रिये मला एका प्रश्नाचे उत्तर दे
प्रियसी : विचारणा
सोन्या : तुझ्या आयुष्यातला मी पहिलाच ना ज्याने तुझे चुंबन घेतले ?
प्रियसी : अर्थातच , पण मला हे कळत नाही सगळे हाच प्रश्न का विचारतात ?

Wednesday, December 14, 2016

लग्न

एक तरुणी एक साधू बाबा समोर

तरुणी : बाबा ! मला दोन प्रियकर आहेत , मला सांगा माझं लग्न कुणाशी होईल , कोण असेल तो भाग्यवान ?
बाबा : (हसून) पाहिल्याशी होईल आणि दुसरा भाग्यवान ठरेल 

Tuesday, December 13, 2016

स्वर्ग

नवरा बायको आपसात चर्चा करीत असताना

बायको - "अहो ऐकलंत का मी ऐकलंय नवराबायको मरून स्वर्गात गेले कि तिथे त्यांना एकमेकाजवळ फिरकू देत नाही म्हणे
नवरा - ह ... म्हणूनच त्याला स्वर्ग म्हणतात कि काय ?

Wednesday, October 12, 2016

नवऱ्याचा खून

भविष्यवक्ता एका महिलेचा हात पाहून भविष्य सांगताना
"तुम्ही लवकरच विधवा होणार आहात तुमच्या नवऱ्याचा खून होईल "
महिला - पण मी त्यातून निर्दोष सुटेल ना?

चहा

डॉकटर रुग्णाला
डॉक्टर : सकाळी उठल्यावर थोडं गरम पाणी पीत चला , काही दिवसात बर वाटेल
रुग्ण : काही उपयोग नाही , वीस वर्षपासून मी तेच कतोय , फरक एवढाच कि माझी बायको त्याला चहा म्हणते 

वृद्ध महिला

एक वृद्ध महिला एका जोडप्याच्या घरी दोन वर्षांपासून राहते, शेवटी पती पत्नीला कंटाळून म्हणतो
पती - तुझी आई आपल्याजवळ गेल्या दोन वर्षांपासून राहतेय  तिला जायला सांग
पत्नी - (आश्चर्याने ) काय ? माझी आई ? मला वाटले कि ती तुमची आई आहे 

Saturday, August 6, 2016

सुट्टी

आजोबा नातवाला 
आजोबा : सोन्या लप जा , तुझी टीचर इकडेच येत आहे 
सोन्या : तुम्हीच लपा, तुम्ही मेलात असे सांगून आठ दिवस सुट्टी घेतली आहे मी .. 

Friday, August 5, 2016

त्रास

नवरा बायकोला काम करतेवेळी छेडत असतांना
बायको - अहो असं काम करतेवेळी त्रास देऊ नका , व्हा बर बाजूला
मोलकरीण - सांगा जरा त्यांना , मी सांगून सांगून दमले

Wednesday, August 3, 2016

OLX

मुलगी आपल्या वडिलांना
मुलगी - मला एक गोष्ट सांगायची आहे
वडील - बोल बेटा
मुलगी - मी एका मुलाशी प्रेम करते आणि तो अमेरिकेमध्ये राहतो
वडील - आरे , पण तू त्याला कशी भेटलीस ?
मुलगी - एका वेबसाइट वर आमच्या दोघांची ओळख झाली, फेसबुक वरती आम्ही मित्र झालो , Skype वर त्याने मला प्रोपोस केले , आणि WAHTSAPP वर आम्ही प्रेमात पडलो
वडील - आच्छा ! तर मग एक काम कर , TWITTER वर लग्न कर , FLIPCART नि मुलं मागव , GMAIL नि रिसिव्ह कर आणि शेवटी नाही आवडला तर OLX वर विकून टाक

NEW BOLLYWOOD MOVIE

Tuesday, August 2, 2016

मृत्यू

एक मित्र दुसऱ्या मित्राला सुंदर मुलीकडे पाहून
मित्र - आरे, जर ती मृत्यू असती, एक दिवस का होईना ती माझी असती
दुसरा मित्र - पण जर ती मृत्यू असती तर एके दिवशी ती सगळ्यांची असती

NEW BOLLYWOOD MOVIE

रिजेक्ट

पत्नी : आहो ऐकलंत का? तो  माणूस दारू पिऊन नाचतोय ना त्याला मी १० वर्षांपूर्वी रिजेक्ट केलं होत
पती : होणं खरंच, पहाणं  आतापर्यंत सेलिब्रेट करतोय

NEW BOLLYWOOD MOVIE

Monday, August 1, 2016

बंदरगाह

शिक्षक : बंदरगाह कशाला म्हणतात ?
विद्यर्थी : माकडांच्या राणांच्या ठिकाणाला

NEW BOLLYWOOD MOVIE

Saturday, July 30, 2016

आईसक्रीम

गिऱ्हाईक : वा ! मजा आला , तुमच्या आईस्क्रीमने गार गार झालो, आता काहीतरी गरमागरम पाहिजे
वेटर : मग हे घ्या बिल !

NEW BOLLYWOOD MOVIE

रिपोर्ट कार्ड

टिकू : बाबा , कुणावर रंगवणं चांगली गोष्ट आहे का ?
वडील : नाही रे ! चांगली माणसे कधीच रागवत नाही
टिकू : मग हे बघा माझं रिपोर्ट कार्ड मी नापास झालोय

NEW BOLLYWOOD MOVIE

Friday, July 29, 2016

डॉकटर

सुधा : डॉकटर मला पचनाचे औषधं घ्या .
डॉकटर: (तपासून) तुझी पचनशक्ती एकदम ठीक आहे
सुधा : पण आई तर म्हणते मला कुठलीही गोष्ट पचत नाही

NEW BOLLYWOOD MOVIE

Thursday, July 28, 2016

पोस्टमन

पती : साहेब माझी पत्नी हरवली आहे
पोस्टमन : हे पोस्ट ऑफिस आहे , पोलीस स्टेशन नाही
पती : ओह .. माफकरा ...! आनंदामुळे कुठे जाऊ , काही कळत नाही !!

NEW BOLLYWOOD MOVIE

Wednesday, July 27, 2016

भूकंप

भूकंप

राजू : आरे ऊठ भूकंप आल्यासारखा वाटतोय, सार घर हलतंय
पंकज : आरे झोपणा घर पडेलच तर घरमालकाचं, आपण तर भाडेकरू आहोत

NEW BOLLYWOOD MOVIE

Tuesday, July 26, 2016

आय लव्ह यु

आय लव्ह यु

मुलगी वडिलांना : बाबा एक मुलगा माझ्या मागे लागला आहे , सारखा मला "आय लव्ह यु " म्हणत असतो .
काय करू ?...
वडील : एक काम कर त्याच्याशी लग्न करून टाक, पुन्हा कधी तो तसे म्हणेल तर मी माझे नाव बदलून टाकेल ...

NEW BOLLYWOOD MOVIE

रॉंग नंबर

रॉंग नंबर

पती आपल्या बायकोला
पती: अग , कमालच झाली, रोजतर तासंतास फोनवर बोलत असतेस , आज अर्ध्या तासातच फोन आटोपला .
बायको : रॉंग नंबर होता, कुणीतरी सरला बोलत होती, आता तिच्याशी किती वेळ बोलणार . 

फेसबुक

फेसबुक

एका ट्राफिक सिग्नल वर एका भिकाऱ्याला पाहून माणूस बोलला
"तुला कुठेतरी पाऊल आहे ..."

भिकारी हसला व म्हणाला
भिकारी: "साहेब... आपण फेसबुक वर फ्रेंड आहोत "

पाहुणे

घरी आलेले पाहुणे मुलाला विचारतात
पाहुणे: कुठल्या शाळेत जातो , बाळा
मुलगा:पहिली गोष्ट मी बाळ नाही , आणि दुसरी मी शाळेत जात नाही मला पाठवतात ... 

सकू

मालकीण : सकू, मला सारखं वाटत, कि आमचे हे आफिसमधल्या दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडले आहेत
सकू (मोलकरीण ): असं नका बोलू बाईसाहेब , ते मला धोका नाही देऊ शकत !

Thursday, July 14, 2016

रिक्षावाला

एका रिक्षावाल्याला पोलिस अडवतो.
पोलिस: रिक्षा गॅसवर आहे?
रिक्षावाला: नाही.
पोलिस: मग डिझेलवर?
रिक्षावाला: नाही.
पोलिस: बरं पेट्रोलवर आहे म्हणजे?
रिक्षावाला: नाही
पोलिस: अरे मग कशावर आहे?
रिक्षावाला: हफ्त्यावर.